कालच, टाईम्स ऑफ इंडिया मधे अरविंद अडिगाचा हा लेख वाचला. शीर्षक होतं "Kannadigas, stand up for Karnataka". ह्या लेखामधे त्यांनी कर्नाटक राज्य इतर दक्षिणी राज्यांपेक्षा कसं वेगळं आहे, आणि कसं वडियार घराण्याच्या नेतृत्वामुळे राज्याने प्रगती केली, इ. इ.
थोडा वेळ इतिहासात रमून घेतल्यावर अडिगा साहेब वर्तमानाकडे वळतात. कर्नाटक विधानसभेत झालेल्या "लाजिरवाण्या" प्रकरणाकडे लक्ष वळवून, ते म्हणतात
म्हणजे काय, तर स्वत:ची कानडी भाषा बेंगळुरू मधे लोप पावत आहे, ह्याचं दु:ख अडिगांना आहे. आणि कानडी ऐवजी हिंदी ऐकावी लागते, ह्याचं त्यांना तीव्र दु:ख आहे. आणि म्हणून ते परत उत्तर देताना कानडीतच उत्तर देतात. समोरच्याला हे कळत असो, अथवा नसो.हेच जर महाराष्ट्रात बाळासाहेब, उद्धव, किंवा राज ठाकरेंनी मराठी बद्दल बोलून दाखवलं असतं, तर ह्या ToI ने त्यांची खिल्ली उडविली असती. महेश भट, किंवा सेलीना जेटली, मुलायम सिंग ह्यांचा करवी मुंबई सगळ्या देशाची आहे, वगैरे वदवून घेतलं असतं. घटनेनं कसं सगळ्यांना कुठेही जायला, रहायला आणि कुठल्याही भाषेत बोलायला हक्क दिलेले आहेत, असं कुणाच्यातरी तोंडातील वाक्य छापून टाकलं असतं.
पण हे सगळं छापून आल आहे, ते ठाकरेंच्या लेखणीतून नव्हे, तर बुकर पुरस्कारचे विजेता माननीय श्री अरविंद अडिगांच्या लेखणीतून. त्यामुळे त्यांना सर्व काही माफ आहे. आता कुणी महेश भट, किंवा लालू यादव भारतीयते बद्दल ब्र काढणार नाही. मग आमच्या मुंबई मधेच त्यांना खोड दिसते? आम्ही मुंबईकरांनी (आणि पुणेकरांनी) जर मराठीचा आग्रह धरला, तर तो प्रांतीयवाद ठरतो आणि टिंगळ-टवाळीचा विषय ठरतो. पण कन्नडीगांनी जर कन्नडचा आग्रह धरला, तर मात्र वर्तमानपत्रात त्यांना एक अखंड स्तंभ दिला जातो. आणि, शेवटी तर अडिगांनी कहर केलाय. कन्नडिगांना उद्देशून ते म्हणतात
त्यांनी असं केलेलं आव्हान प्रांतवाद ठरत नाही, पण राज ठाकरेंनी केलं तर मॅडमजी आणि सरदारजी मुख्यमंत्र्यांना ताकीद देतात, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची. लुंगीवाले मंत्री राज ठाकरें विरुद्ध केस ठोकायला लावतात. आणि बिहार-झारखंड मधे कुणीही येरा-गबाळा ठाकरें विरुद्ध मानहानी ची केस ठोकतो.
४ टिप्पण्या:
अगदी हेच विचार मझ्या डोक्यात आले होते काल TOI वाचतांना.. महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरला तर तो संकुचित प्रांतवाद आणि कर्नाटक-बंगालमधे मात्र भाषिक अस्मिता आणि भाषाभिमान.
सोप्या शब्दांत सांगायचे तर कुठलेही राज्य असो, जर तुम्ही तिथे पोटापाण्यासाठी जाताय तर तिथली भाषा शिकायलाच हवी. मराठी तमिळनाडूमधे गेला तर त्याने तमिळ शिकावी आणि तमिळ महाराष्ट्रात आला की त्यने मराठी शिकावी.
अरविंद अडिगाविरुद्ध अजून कोणी बोलले नाही, यातूनच दुटप्पीपणा दिसून येतो.
संकेत,
राज ठाकरेंनी सुद्धा एका मुलाखतीत हेच सांगितलं. मराठी माणूस जर केरळ मधे गेला, तर त्याने तिथल्या रिती पाळल्या पाहिजेत. स्थानिकांशी जुळवून घेतलं पाहिजे. तसंच महाराष्ट्रात येणार्याने येथील स्थानिकांशी जुळवून घेतलं पाहिजे. स्वत:ला त्यांचावर लादू नये.
पण आश्चर्य म्हणजे, अजून अडिगांविरुद्ध कुणीच काहीही बोलय का नाही?
Very nice post! I suggest you to send this (your reply to this article of TOI in english) to TOI's editor & other editorial contacts of TOI's reporters & also email to PM,HM & Bihar's hindi newspapers in hindi language.
प्रवीण,
हे काम जसं माझं आहे, तसं तुम्हा वाचकांचं पण आहे!! तुम्ही हा संदेश अधिकाधिक लोकां पर्यंत पोहचवू शकता. मी ToI ला ह्याचं इंग्रजी भाषांतर पाठवीनच!! पण तुम्ही सुद्धा हा संदेश पसरवा!
टिप्पणी पोस्ट करा