टाईप-रायटर म्हण्टलं की कान घुमतो तो टक-टक-कडकट आवाज, दिसतात ते कोर्टा समोर बसलेले टंक-लेखक जे अगम्य भाषेत अनेक करार आणि शपथपत्र टाईप करून देतात. आणि आता तर कॉम्प्युटरच्या वापरामुळे हा टाईप-रायटर दृष्टिआड होऊन लोप होऊ लागला आहे.
श्री भिडे, यांनी टंकलेले पुलंचे छायाचित्र आणि पुलंनी दिलेली दाद |
गेली ४३ वर्षं त्यांनी ही कला जोपासली आहे. केवळ टाईप-रायटर वरील अक्षरांच्या छापण्याची जागा सांभाळून श्री भिडे अनेक अश्चर्यकारक चित्रं रेखाटू शकतात. श्री भिडेंनी महात्मा गांधी, छत्रपति शिवाजी महाराज, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, पु.ल. देशपांडे, सुनील गावस्कर, इ. अनेक सुप्रसिद्ध व्यक्तिंची चित्र टाईप-रायटर वापरून काढली आहेत आणि काहींनी तर त्यांना व्यक्तिगत रित्या दाद दिलेली आहे. त्यांनी आर. के. लक्षमण ह्यांच्या कॉमन-मॅनचं चित्र रेखाटून स्वत: लक्षमण ह्यांची दाद मिळवली आहे. ह्या शिवाय, मारियो मिरांडा, मंगेश पाडगावकर, इ. मान्यवरांनी सुद्धा त्यांच्या कलेची दाद दिली आहे. त्यांच्या ह्या कलेची कदर करण्यासाठी मुंबई महापालिकेने सुद्धा त्यांचा सक्तार केला आहे. श्री भिडेंनी काढलेल्या कलाकृतींची मुंबई, पुणे, नाशिक इ. ठिकाणी प्रदर्शनं भरत असतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा