सोमवार, जून ०८, २००९

स्मारक: महाराजांचे आणि खानाचे

बरेच दिवस ह्या विषयावर लिहायचे केले होते. पण, विसरून जात होतो. उद्धव ठाकरेंच्या कालच्या वर्तमानपत्रातल्या वक्तव्यामुळे ह्याची पुन्हा आठवण झाली. खरं म्हणजे उद्धव ठाकरे माझ्या मनातलेच बोलले. त्यामुळे अजून काय लिहावे तेच कळत नाही. समर्थ, दादोजी आणि गागाभट्टांचा द्वेष करणार्‍यांनी खरं तर आधी उद्धव ठाकरेंच्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. त्याशिवाय त्यांनी हा ब्राम्हण द्वेष चालू ठेवण्यात कुठलीच मर्दांगी नाही.

समर्थांनी संभाजी राजेंना पत्र लिहिलं. त्यात त्यांनी संभाजींना राज्य कसं करावं आणि स्वराज्य कसं टिकवावं हे सांगितलं. त्या काव्य पत्रातील शेवटची चार पदं इथे देतोय-

शिवराजास आठवावें । जीवित्व तृणवत् मानावे ॥
इहलोकीं परलोकीं राहावे । कीर्तिरूपें ॥१५॥
शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ॥
शिवरायाचा आठवावा साक्षेप । भूमंडळीं ॥१६॥
शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायाचें कैसें बोलणे॥
शिवरायचे सलगी देणें । कैसे असें ॥१७॥
सकळ सुखांचा त्याग । करून साधिजे तो योग ॥
राज्यसाधनाची लगबग । कैसी असे ॥१८॥
त्याहूनि करावे विशेष । तरीच म्हणावे पुरुष ॥
या उपरी विशेष । काय लिहावें ॥१९॥

महाराजांबद्दल एवढे गौरवोद्गार समर्थांनी काढले आहेत. आणि शेवटच्या कडव्यात त्यांनी पुरुष कोणाला म्हणावे हे ही लिहिलं आहे. आता महाराजांच्या कृतिपेक्षा विशेष काही करायला मेटे, चोंदे, गायकवाड आदिंना काही जमलं आहे असं दिसत नाही. त्यामुळे त्यांना 'पुरुष' म्हणावे काय, असा प्रश्न आहे. दुसरं असं, की शिवरायांबद्दल एवढं कौतुक आणि आकलन समर्थांनी केलं आहे, ते काय महाराजांना जवळून जाणल्या शिवाय? दर वर्षी राम-नवमीच्या उत्सवाला महाराजां तर्फे रसद सज्जनगडावर पोहोचवली जायची. महाराजांना समर्थांविषयी आस्था असल्या शिवाय का ही सहायता केली जात होती? ह्याचा ही हे मराठा नेते विरोध करतील.

दुसरं म्हणजे, उद्धव ठाकरे म्हणतात तसं, ह्या मराठा नेत्यांना अफझलखानाची कबर आणि त्याचं दर्ग्यात झालेलं रूपांतर चालतं. ते कुणी तोडायचं बोलत नाही. प्रतापगडाच्या पायथ्याशी हिंदू-मुसलमान दंगे होतात. अफझलखानाचा तथाकथित स्मृतिदिन असला की तिथे तंग वातावरण असतं. तर एवढे वर्ष ह्या मराठा नेत्यांना अफझलखानाचा उदो-उदो होत असल्याचं खटकलं नाही. इतिहासानुसार खान हा संत नसून त्याने तुळजापूर, पंढरपूर, इ. देवळं उध्वस्थ केली, हिंदूना- मग ते ब्राम्हण असो किंवा मराठा- छळलं होतं. तो इतिहास विसरून त्या खानाची कबर आणि त्याचं दर्ग्यात झालेलं रुपांतर ह्या मराठा नेत्यांना कसं खपतं? प्रतापगडावर चाललेला हा तमाशा ह्यांना कसा काय चालतो? दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदास हे स्वराज्याच्या विरोधात तरी नव्हते.

थोडक्यात सांगायचे झाले, तर ज्यांनी स्वराज्य घडवून आणले, त्यांचा स्मारकाबद्दल एवढा वाद निर्माण होतोय. आणि जो स्वराज्यावर चाल करून आला, त्याच्या स्मारकाचा दर्गा होऊन तिकडे उरुस वगैरे साजरे होत आहेत. ही हिंदवी स्वराज्याची चेष्टा नाही तर अजून काय आहे?
स्मारक: महाराजांचे आणि खानाचेSocialTwist Tell-a-Friend

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

hya "sambhaji brigade" chya murkha lokan mule Shivaji Maharajanchi kimmat Ambedkara itaki honar ahe.

swastik म्हणाले...

प्रतापगडावरील अतिक्रमण काढण्याची मागणी !

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतापगडावरील अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेऊन शासनाने अफजलखानाच्या थडग्याचे उदात्तीकरण थांबवावे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार श्री. अरविंद सावंत यांनी काल विधान परिषदेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली.

(छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारण्याच्या गप्पा मारणार्‍या काँग्रेस शासनाने प्रथम याबाबत कारवाई करण्याचे धाडस दाखवावे. - संपादक) श्री. सावंत म्हणाले की, प्रतापगड उत्सव समितीने प्रतापगडावरील अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. २००४ मध्ये न्यायालयाने सर्व अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले होते. असे असतांना शासनाने उलट ही बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतल्याने उत्सव समितीला सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. त्यानंतर न्यायालयाने शासनाला पुन्हा आदेश देऊनही अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. (न्यायालयाच्या आदेशालाही न जुमानणारे असे गेंड्याच्या कातडीचे शासन हटवायलाच हवे.-संपादक )

Source : Dainik Sanatan Prabhat


Also


NCERT Book

Some objectionable mistakes from Std 7 th book 'Our Past - 2'
In the text book of NCERT for Standard 7 ‘Our Past – ll’ there are only 5 lines on Chattrapati Shivaji Maharaj.
60 pages given to Mughal’s history and Mughal rulers who made the Hindus slaves.
Not even a single photo of valorous Chattrapati Shivaji Maharaj is printed. The place for the photograph is left blank.
While the photos of atrocious, tyrannical Muslim kings, Babar and his descendants starting from 700 AD are printed.
No mention of Chattrapati Shivaji Maharaja’s ‘Hindavi Swarajya’ but it is just mentioned as ‘local government’.
No mention at all of Maharana Pratap who had fought with Mughal and who sacrificed the leisure of royal palace and used to sleep on the grass like ordinary people.

See video :NCERT for Standard 7 ‘Our Past – ll’ there are only 5 lines on Chattrapati Shivaji Maharaj.