१. १९८४ मधल्या शीख-विरोधी दंगलीं मधे हात असल्याचा आरोप असलेले जगदीश टायटलर आणि सज्जन कुमार हे कॉँग्रेसचे असताना सुद्धा कॉँग्रेस पक्ष देश-द्रोही पक्ष नव्हे, तर देश-भक्त पक्ष ठरतो. पण केवळ पोलीसांनी चार्गशीट मधे इंद्रेशकुमार नाव घातलं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देश-द्रोही कसा ठरतो?
२. देशात अथवा देशा बाहेर, कुठल्याही राष्ट्र-द्रोही कृत्यात संघाचा हात असल्याचं अजूनही सिद्ध झालेलं नसताना, संघ आणि सिमी ह्या दोन्ही संगठनांची तुलना तरी कशी केली जाऊ शकते?
३. राष्ट्रकुल खेळांचा आयोजन करताना अंदाजे ७०,००० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. आयोजक समिती अध्यक्ष सुरेश कलमाडी, दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षीत, दिल्लीचे उप-राज्यपाल तेजिंदर खन्ना हे सगळे काँग्रेसचे असताना, सोनीया गांधी म्हणत नाहीत की ह्या लोकांनी देशाची वाट लावली. पण बिहार मधे मात्र गेल्या २० वर्षात पूर्ण वाट लागलेली आहे, असं सोनीयांचं मत आहे.
४. भारतीय जनता पक्ष हा मूलतत्ववादी पक्ष आहे, पण हिरव्या बॅकग्राउन्ड वर चांद-तारा चिन्ह असलेलं Indian Union Muslim League हा पक्ष मात्र धर्मनिरपेक्ष आहे. ह्या पक्षाशी केरळ आणि केंद्रामधे काँग्रेसची आघाडी आहे.
५. काश्मीर खोर्यातल्या मुसलमानांना लश्कर आणि पोलीसांचा त्रास होतो, म्हणून ते पेटून उठतात, असं म्हणत अरुंधती रॉय त्यांच्या बाजूने गळा काढते. सयैद गिलानी पण भारता विरुद्ध गरळ ओकत असतो. पण त्याच काश्मीर खोर्यातील काश्मीरी पंडितांना कुणीही विचारत नाही, की त्यांना कुठे रहायचं आहे. लश्करामुळे त्रास झालेले मुसलमान जर भारता विरुद्ध पेटून उठायची बात करत असतील, तर अतिरेक्यांमुळे आपला जीव वाचवण्यासाठी घर-दार, नोकरी-धंदा सगळं आहे तसं सोडून आलेल्या ह्या काश्मीरी पंडितांनी काय करावं?
असो, ह्या गोष्टींवर आपण फक्त विचार करु शकतो. कारण, आपलं ऐकून घेणारं कुणीच नाही आहे. अरुंधती रॉय आणि गिलानी सारख्या बोंबलणार्यांचं ऐकणारे अनेक. किंवा ज्याच्या हाती पैश्याची सत्ता त्यांच ऐकणारे. आपण केवळ ब्लॉग लिहायचा आणि वाचायचा!!

४ टिप्पण्या:
आपला blog वाचला. सर्व मुद्दे पटले. (त्यातील काहींचा विचार आधीही केला होता). मात्र आपल्या शेवटच्या परिच्छेदात/वाक्यात हताशपणा जाणवला. सामान्य माणूस एकट्याने फार काही करू शकत नाही. मात्र काहीच करू शकत नाही असेही नाही. आज तुम्ही तुम्हाला जे वाटले ते blogच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवलेत. तेच इतर माध्यमातूनही अजून काही लोकांपर्यंत पोहोचेल असे पहा. ओर्कुट, फेसबुक अश्या social networking sites वापरत असला तर उत्तम. यावरून तुम्ही लिहिलेली ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवणे सोपे आहे. तुमच्या परिचयातील व्यक्तींना तुम्ही तुमचा हा लेख E-mailद्वारेही पाठवू शकता. तुमचा E-mail ज्याला पटेल ती व्यक्ती तोच E-mail परत पुढे इतरांना पाठवेल. हळू हळू का होईना लोकांपर्यंत तुमचा विचार पोहोचत राहील. तुम्हाला शुभेच्छा..
अपूर्व,
तुमचं सांगणं बरोबर असलं, तरीही केवळ नेटवर्किंग साईट्सवर आपला संदेश पोहचवून काय मिळणार आहे? सुशिक्षितां मधे मतदानाची उदासीनता देशभर जाहिर आहे.
आणि केवळ विचार पोहचून काय उपयोग? जे मतदान सुद्धा करत नाहीत, ते ह्या गोष्टींवर काय कृती करणार आहेत? केवळ क्रियेवीण वाचाळता ठरणार!!
विनय,इतके निराश नक्कीच होऊ नका.आत्ताच्या पिढीचे तरुण आता ह्या बाबतीत जागरूक होत असून शिक्षणाच्या प्रसारा मुळे नि अंगभूत हुशारी मुळे मतदाना साठी आवर्जून बाहेर पडायला लागल्याचे चित्र निदान महाराष्ट्रातल्या शहरा मधून तरी नजरेस पडत आहे.उत्तरे कडील राज्यातून हि वेळ यावयास अजून बराच वेळ लागेल हे मात्र मान्य आहे.
mynac,
नुकत्याच पार पडलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकी मधे केवळ ४८% मतदान झाले. ही वृत्तपत्रांमधे छापून आलेली आकडेवारी आहे. आता सांगा, हल्लीचे किती तरुण जागरुक आहेत ते?
टिप्पणी पोस्ट करा