गुरुवार, मे ०८, २००८

गेली भिती सारी

तसं पोहायला मला लहानपणापासूनच येतं. पण ते पोहणं म्हणजे नुसतं पोहणं होतं. त्याला फार काही तंत्र नव्हतं. नुसतं आपलं तरंगायचं आणि पाण्यात पुढे सरकत रहायचे. त्यामुळे एकतर वेग येत नव्हता आणि दुसरं म्हणजे कधीही पोहून झाल्यावर व्यायाम झाल्या सारखे वाटत नव्हते. म्हणूनच IIT मधे Intermediate camp ची घोषणा झाल्यावर त्यात सहभागी होण्याचं मी आणि स्वानन्द ने निश्चित केले. पहिल्या दिवशी रेड्डी सरांना कॅम्पला येण्या संबंधी विचारले. सर म्हणाले की १ कि.मी. पोहता आले तरच तुम्हाला कॅम्प मधे सहभागी होता येईल. झाली ना पंचाईत! या आधी पोहायचो, पण १ कि.मी.? कधीच नाही. फार तर फार ०.५ कि.मी. पोहलो होतो. आणि ते झाल्यावर खोली वर येऊन आडवा झालो होतो. तरी पण स्वानन्दच्या सांगण्यावरून पाण्यात उतरलो.

आमच्या बरोबर त्या कॅम्पला इयत्ता ३री ते साधारण ७वी ची मुलं होती. ती पोहण्यात इतकी तरबेज होती की मला ओशाळल्या सारखं झालं. मग ठरवलं की आता पीछे हाट नाही. पोहूनच दाखवायचं. रेड्डी सरांना आधी कल्पना दिली की पोहणे सुमार आहे, त्यामुळे थोडं गडबड होऊ शकते. पण सरांनीच मला प्रोत्साहन दिलं. म्हणाले की हरकत नाही. तू जर प्रयत्न केलास तर होईल.

मग काय, उतरलो आणि लागलो पोहायला. हळू-हळू करत धापा टाकत जवळ-जवळ ०.७५ कि.मी. पोहलो. सर म्हणाले चालेल. उद्या पासून यायला हरकत नाही. एक परीक्षा पार झाली! पुढचे १५ दिवस आता खडतर तपश्चर्येचे आहेत. पण अजिबात तंत्र-शुद्ध पोहणे येत नसताना मला एवढे पोहता आले हे पाहून माझा आत्मविश्वास एकदम वाढला. पोहण्या बद्दलची जी माझी भिती होती ती पूर्ण पणे नाहीशी झाली. आता १५ दिवसांनी काय होते ते बघू.

गेली भिती सारीSocialTwist Tell-a-Friend

३ टिप्पण्या:

HAREKRISHNAJI म्हणाले...

केल्याने होत आहे रे आधी के्लेची पाहीजे.

Vinay म्हणाले...

harekrishnaji

बोलणे सोपे असते, करणे कठीण असते!!

मोरपीस म्हणाले...

एक अत्यंत चांगला संदेश आपण सर्वांना दिलाय. मनातली भीती नाहिशी झाली की समोर आलेली संकट आपण लिलया पार करू शकतो. मला फ़ार आवड्ला आपला हा संदेश