गुरुवार, मे ०६, २०१०

सन्माननीय कुमार केतकर यांस

नमस्कार,
आपला लोकसत्तेतला अग्रलेख वाचला. शीर्षक पण भन्नाट आहे.
महाराष्ट्रची 'वाट'चाल : मुंबई मिळाली, महाराष्ट्र हरवला!
आपण महाराष्ट्राच्या चुकांचा एकदम पंचनामाच तयार केला आहे. मराठी रंगभूमीने, साहित्याने, कलाक्षेत्राने उरलेल्या भारतावर काहीच प्रभाव पाडला नाही, असा तुमचा तर्क आहे. ह्या उलट बंगाली आणि हिंदी साहित्याने आणि कलाक्षेत्राने आपली एक वेगळी छाप पाडली, असं तुमचं म्हणणं आहे. साहित्यासाठी उदाहरणं देताना तुम्ही रविन्द्रनाथांचं उदाहरण देता. पण रविन्द्रनाथ हे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात यायच्या आधी होते, हे विसरलात. हिंदी भाषेतील लेखकांमधे तुम्ही प्रेमचंदचं उदाहरण देता, इंग्रजीत मुल्कराज आनंद. पण ह्या सर्वांचा कार्यकाळ महाराष्ट्र राज्य निर्माण होण्या आधीचा आहे, हे तुम्ही विसरता. मुल्कराज आनंद जरी स्वातंत्र्यानंतर हयात होते, तरी त्यांचं साहित्य लेखन थांबलं होतं.

ह्या उलट पु.ल. हे राज्य स्तरावरील एकमेव साहित्यिक होते, की ज्यांच्या सभांमुळे तुमच्या लाडक्या कॉंग्रेस पक्षाचे खासदार पडले आणि जनता पक्षाचे खासदार निवडून आले. स्वातंत्र्यानंतर आणि संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापने नंतर एक महाश्वेता देवी वगळता असे किती साहित्यिक आहेत, ज्यांच्या भाषणांनी निवडणुकीची दिशा बदलू शकते?

राजकारणात तुम्ही जे म्हणता ते सत्य असेलही. पहिले, सी.डी. देशमुख आणि त्या नंतर यशवंतराव चव्हाण ह्यांच्या शिवाय केंद्रात एकही प्रभावी नेता महाराष्ट्रातून झाला नाही. पण सुनील प्रभू आणि मनोहर जोशींचे कार्य आपण एकदम कचर्‍यात टाकून दिले! त्या दोघांच्या कामाला सर्व स्तरावरून प्रशंसा मिळाली होती, हे विसरलात.

महाराष्ट्राचा इतिहास शिवाजी महाराज आणि पेशवे ह्यांच्या बरोबर संपतो, असं तुम्ही लिहिलं आहे. पण ह्याच महाराष्ट्रात लोकमान्य टिळक आणि आगरकरां सारखे स्वातंत्र्य सैनिक आणि समाज सुधारक तयार झाले. सशस्त्र क्रांतीचे जनक वासुदेव बळवंत फडके सुद्धा महाराष्ट्रातले. चाफेकर बंधू, सावरकर बंधू, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, हे सगळे महाराष्ट्रातले. ह्यांच्या सारखे नेते इतर कुठल्या राज्याला लाभले का? तुम्ही "सिमबॉलिझम" वर भर देताय, म्हणून मी पण तेच करतोय. नाहीतर अजून खोल जाऊन तर्क-वितर्क करता येईल.

हिंदी चित्रपट क्षेत्रात सुद्धा तेच. तुम्ही ’उत्तरे’ कडील लोकांचे वर्चस्व आहे असं म्हणता. पण सोईस्कर पणे लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर ह्यांना विसरता. तनुजा आणि शोभना समर्थ ह्यांना पण तुमच्या मते काहीही किम्मत नाही. अमोल पालेकर, आणि एकेकाळी सगळ्या हृदयांची धक-धक उडवणारी माधुरी दिक्षित हे मराठीच आहेत. मराठी भाषेतील दोन चित्रपट ऑस्करच्या स्पर्धे साठी निवडले गेले आहेत. हिंदी वगळता इतर कुठल्याही भाषेतील भारतीय चित्रपट ऑस्करला गेले नाहीत, हे तुम्ही विसरलात.

ह्या सगळ्या बाबींकडे लक्ष देऊन माहिती मिळवताना तुमची इतकी दमछाक झाली की क्रीडा क्षेत्राकडे तुमचे दुर्लक्षच झाले. आणि ह्या क्षेत्रातले महाराष्ट्राचे योगदान (किंवा त्याचा अभाव) नमूद करायचं राहून गेलं. तर तुम्हाला आठवण करून देतो. ऑल्मपिक स्पर्धेत व्यक्तिगत खेळां मधे आज पर्यंत भारताला केवळ पाच पदकं मिळाली आहेत. पैकी पहिलं, महाराष्ट्राच्याच खाशाबा जाधंवांनी मिळवलं होतं. अंजली वेदपाठक, अभिजीत कुंटे, भाग्यश्री ठिपसे, प्रवीण ठिपसे, हे मराठीच आहेत. आणि क्रिकेट बद्दल काय बोलावं? माधव मंत्री, सुनील गावस्कर, सचीन तेंडुलकर, विजय हजारे, विजय मांजरेकर, हृषिकेश कानिटकर, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, अजीत आगरकर, जहीर खान, हे अस्सल मराठीच आहेत. ह्यांच्या योगदानाचा उल्लेख करावासा वाटला नाही तुम्हाला?

तुम्ही म्हणता तसं महाराष्ट्रात आपल्या मना सारख्या सर्वच गोष्टी घडल्या नसतील. पण सर्व काही नकारार्थी नेण्या सारखे सुद्धा घडलं नाही. पण एखाद्याला केवळ उणीवाच काढायच्या असतील, तर असे इंग्लंड-अमेरिकेत गेलेले अनेक भारतीय-मुळाचे लोक आहेत, जे भारत-निंदेला आपले जीवित कार्य मानतात. तुम्हालाही त्यांच्यात सामील व्ह्यायचे आहे का? बरं एवढा सगळा उणीवांचा पाढा वाचून दाखवल्यावर त्यातून बाहे पडायचा मार्ग काय, ह्या विषयी एकही अक्षर लिहिलं नाहीत? हे म्हणजे डॉक्टरने आजाराची सगळी कारणं सांगून औषधं न देता पेशंटला घालवून देण्या सारखे झाले. तर सांगायचा मुद्दा असा, की जरी आम्ही मराठी लोकं काही क्षेत्रात मागे पडलो असलो, तरी तुम्ही म्हणता तसं सगळं संपल्या सारखं नाही. आणि तुमचे असे नकारार्थक लेख वाचून कृपया आमच्या आत्मविश्वासाला ठेच पोहोचवू नका.
सन्माननीय कुमार केतकर यांसSocialTwist Tell-a-Friend

११ टिप्पण्या:

हेरंब म्हणाले...

प्रिय विनय, उत्कृष्ट प्रत्युत्तर. अतिशय आवडलं. केतकरांचा लेख वाचून माझाही असाच संताप झाला होता. त्यांना तुम्ही तोडीस तोड उत्तर दिलं आहेत. सोनियाच्या तळव्यापासून सुरु होऊन राहुलच्या तळव्याशी येऊन संपणारी केतकरांची पत्रकारिता.. त्यांना हे असलेच दोष दिसणार महाराष्ट्राचे.

पुन्हा एकदा अभिनंदन !!

Vinay म्हणाले...

प्रिय हेरंब,

केतकरांचा लेख पूर्णपणे नकारण्यात शहाणपणाचं ठरणार नाही. ते म्हणतात त्यापैकी काही गोष्टी खर्‍याच आहेत. BSE मधले स्टॉक ब्रोकर, उद्योग धंद्यात मराठी माणसाची पिछाडी हे सत्य आहे. आणि राजकारण दिशाहीन म्हणतात ते ही खरं आहे.

शरद पवार आणि विलासराव देशमुख सारखे दिग्गज(?) मंत्री केंद्रात असताना महाराष्ट्रात रेल्वेचे कितीतरी प्रकल्प रखडून पदले आहेत. ह्या उलट, बंगाल आणि बिहार मधे रेल्वे ने अनेक प्रकल्प उभारले आणि अनेक नवीन उपक्रम चालू केले. लालू आणि ममता ह्यांचं रेल्वे अर्थसंकल्प अनुक्रमे बिहार आणि बंगाल केंद्रीत असतो.

महाराष्ट्राचा केवळ उपहास करून, राज्याविषयी काहीही चांगलं नाही असं लिहिल्याने मला ह्या गोष्टीचा राग आला. बाकी सुधारणा होण्यासारखं बरंच काही आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे.

Harshad म्हणाले...

Ketkara n cha lekh malahi khatakala hota; especially tyancha tone. Tya n chya sarakhya patrkaraane ase ka lihave yaache kaaraN kalat nahi.
Aso. Aaple uttar changale(ch) ahe.

हेरंब म्हणाले...

नाही विनय. लेख पूर्णपणे नाकारावा असं मी म्हणत नाही. त्यात (नावडते असले) तरी योग्य मुद्देही आहेतच. पण खटकलं ते दोष दाखवून देण्याची पद्धत, त्यांचा तो टोन. अतिशय एकांगी.
तसंही कुमार केतकरांबद्दल माझं अजिबात चांगलं मत नाही. त्यामुळेही कदाचित अजून राग आला असेल. एवढा व्यासंगी, विद्वान, ज्ञानी माणूस पण संपूर्ण आयुष्य फक्त काँग्रेसचा गोंडा घोळण्यात वाया गेलं असं मला तरी स्पष्ट वाटतं. असो.

Vinay म्हणाले...

हेरंब, तुझं म्हणणं बरोबर आहे, केतकर काँग्रेसचा उदो-उदो करायची संधी कधी सोडत नाहीत, पण ह्या लेखात त्यांनी काँग्रेसचा पण समाचार घेतलाय.

टोन न आवडण्या सारखाच आहे. कदाचित मुद्दाम तसा असेल. त्यातूनच प्रतिक्रिया उत्पन्न होतात. ह्यातून बोध घेण्यासारखे काय आहे, हे ओळखणे गरजेचे आहे.

मला पण त्यांच हे एकांगी लिहिणं पसंत नव्हतं. म्हणून मी हा पोस्ट लिहिला.

Vivek म्हणाले...

विनय

लेख आवडला. नंतर प्रतिक्रियेवर दिलेली उत्तरंही संयत आहेत.

केतकरांच्या लेखाबाबतीत एक दोन मुद्दे आहेत त्याबाबत काही दिवसांनी लिहीन, सध्या थोडा धावपळीत आहे. त्याच सुमारास मुकेश अंबानींनीही ‘मी महाराष्ट्रीयन’ हा लेख लिहिलाय. दोन्ही लेख तुलना करण्यासारखे आहेत.

विवेक.

Vinay म्हणाले...

विवेक,

मुकेश अंबानींचा लेख वाचून आपण त्यांची प्रशंसा करत बसलो, तर ते चुकीचं ठरेल. कारण अंबानींनी मराठी संस्कृतीला किती आत्मसात केलं आहे, ह्या बद्दल शंका आहे. तेवढं सोडा, आपण जरी "सिंबॉलिझम" वर भर दिला, तरी अंबानींच्या कुटुंबीयांना मराठी बोलता येतं का? ते मराठी साहित्य, वर्तमान पत्र वाचतात का? मराठी चित्रपट (मराठीत) किंवा मराठी बातम्या बघतात का? खुद्द अंबानींच्या कार्यालयात कितीसा व्यवहार मराठीत होतो? जर त्यांनी दैनंदिन जीवनात मराठी आत्मसात केली नसेल, तर असले लेख लिहून काहीही उपयोग होणार नाही. ते पुन्हा फक्त सिंबॉलिझम पर्यंतच राहतं.

Vivek म्हणाले...

विनय

मुकेश यांचा लेख प्रशंसनीय नाही, की त्यामुळं फार हुरळून जाण्यासारखं नाही असं मलाही वाटत होतंच. तुम्हीही तोच विचार अधोरेखित केलाय. तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे.

सध्याच्या वातावरणात एक धोरण किंवा स्ट्रॅटेजी म्हणून मुकेशनी हा लेख लिहिला असणार असं मला वाटतं.

या विषयात एक-दोन इश्यूज्‌ आहेत, त्याबद्दल जरा नंतर लिहीन.

www.sumbran.blogspot.com म्हणाले...

कुमार केतकर हे असेच आहेत

त्यांच्या कडून वेगली अशी अपेक्षा ठेवणे हे चुकच

या लोकाना स्वतः काही करायचे नसते आणि इतराना नाकरायाचे असते

आणि आपण खुप काही करतो असा आव आणायचा असतो

एक गोष्ट आता आठवली हे सरे समाज वादी विचारसरनिचे

लोक्क्से असतात बघ,,,,

एका जोडप्याला अडवून त्याच्या समोर त्याच्या बायकोवर

गुंड बलात्कार करतात

आणि कार्यभाग आटोपल्यावर ते निघून जातात

मग तो नवरा तिला म्हणतो चल घरी जावू

प्रचंड रागावून टी त्याला रागावते तू के करत होतास

तूला लाज नहीं का वाटली ?

त्यावर तो म्हणतो वा नाही कस?

ते ज्यवेली तुज्य्वर बलात्कार करत होते मी त्यावेळी

हातातील छत्री बाजूला घेवुन मी त्यांच्या गांडीला उन्हाचे चटके देत होतो

Vinay म्हणाले...

श्री राम प्रहर जी,

मी आधीच्या टिपण्यांमधे म्हंटलं आहे, तसं पुन्हा सांगतो. कुमार केतकरांचा लेख पूर्णपणे नाकारण्यात शहाणपणा नाही. त्यांनी लिहिलेल्या काही गोष्टी कटू सत्य आहेत. त्यातला कुठला भाग घ्यायचा आणि कुठल्या वर टीका करायची हे ज्याचं त्याने ठरवावं. पण त्यांच्यावर सरसकट टीका झोडू नका. ह्यातून साध्य काही होणार नाही आणि आपण कटू सत्याकडे पाठ करून उगीच आत्मप्रशंसेत मग्न होऊन जाऊ.

श्री विवेक,
तुमच्या लेखाची वाट बघत आहे.

www.sumbran.blogspot.com म्हणाले...

mi aata gavala jat aahe aalyvar yavarhi mi jaru tippni karen aapla sunil bhumkar
www.raamprahar.blogspot.com
www.durgaayan.blogspot.com
www.agnihotra.blogspot.com
www.bhumkrs.blogspot.com