आता पर्यंत तुम्ही मी शिवाजी राजे भोसले बोलतोय च्या बर्याच समीक्षा वाचल्या असतील. म्हणूनच ही समीक्षा नसून एक प्रोत्साहन आहे. तुम्हाला हा सिनेमा बघण्यासाठीचं. हा सिनेमा जरूर बघा. कारण महाराजांचे बोल कुणीही दुर्लक्षित करू शकत नाही. ह्या सिनेमा मधे, महाराजांनी केलेला उपदेश अमुल्य आहे. तो केवळ मराठी माणसाला लागू होत नसून स्वाभिमानाने जगू इच्छिणार्या प्रत्येकासाठी आहे.
ह्या सिनेमात उगीचच "मराठी संस्कृतीचं" उदो-उदो केलं जात नाही. मधू सप्रे, विदिशा पावटे, मुग्धा गोडसे, ह्यांचं कौतुक दादा फाळके, आशुतोष गोवारीकर, अनिक काकोडकर, इ. एवढेच केले आहे. म्हणजे, मराठी माणूस जसा pioneer आहे, तसा आधुनिक पण आहे. ह्या सिनेमातील नायक आपल्या मुलीला उगाचच मध्यम वर्गीय संस्कृतीच्या नावा खाली सिनेमात भाग घेण्यापासून रोखत नाही.
दुसरं म्हणजे शिवाजी महाराजांचं दिनकरराव भोसलें बरोबर संभाषण. त्यातले काही संवाद जिव्हारी लागतात. उदाहरणार्थ: "स्वराज्याचे तोरण फुल-बाजारात विकत मिळत नाही. त्या साठी युद्ध करावं लागतं, प्राणांची आहुती द्यावी लागते." अजून एक: "आमची कुठेही शाखा नाही अशी पाटी लावता. ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे त्याचा अभिमान बाळगता", अशी मराठी हॉटेल-खानावळी चालवणार्यांवर टीका, खरीच पटते.
तिसरं म्हणजे मकरंद अनासपुरेचं कॉमिक टाईमिंग आणि संवाद. "केसभर गजरा आणि गावभर नजरा". ह्या व्यतिरिक्त, ह्या सिनेमात समाजातल्या अनेक समस्या दाखवल्या आहेत. उदाहरणार्थ, बांधकाम व्यावसायिक आणि महानगर पालिकेतील कर्मचार्यांची जुगलबंदी, त्यातून होणारा सामान्य माणसाला त्रास. शिक्षण सम्राटांची मनमानी आणि जीव घेण्या स्पर्धेमुळे अर्ध्या टक्क्याने मार्क कमी झाल्याने पाहिजे त्या ठिकाणी प्रवेश न मिळणे.
एकूणच हा सिनेमा पाहिला तर एवढे लक्षात येतं की स्वाभिमानाने जगायचं असेल तर त्यासाठी लढावं लागणार. कारण आजच्या परिस्थितीला आपला नाकर्तेपणाच जवाबदार आहे. शिवाजी जन्माला यावा आणि तो सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या घरात.