"एकदम मस्त होता ना सिनेमा? बर्याच दिवसांनी एवढा चांगला सिनेमा पाहिला." त्याच्या दिशेने किंचीत मान झुकवून आणि चेहर्यावर एक हलकं स्मित आणित ती म्हणाली. तिच्या वाढदिवसाचं निमित्त साधून दोघांनी मल्टीप्लेक्स मधे सिनेमा बघायचं ठरवलं. वास्तविक पाहता त्याला मल्टीप्लेक्स मधे चित्रपट पहायला अजिबात आवडत नाही. एका चित्रपटावर ५००-६०० रुपये खर्च करणे त्याला कधीच पटलं नव्हतं. म्हणून तो फक्त विजय किंवा अलका मधे चित्रपट बघायचा. म्हणूनच आजचा बेत कळल्यावर तिला आश्चर्याचा धक्काच बसला होता. तिच्या आनंदासाठी त्याने आपल्या व्यवहारी मनाला मुरड घातली होती. आणि म्हणूनच ती काहीही न बोलता त्याच्या बरोबर गेली होती. चित्रपटगृहाजवळ येई पर्यंत तिला "आपण कुठला सिनेमा बघणार" हे सुद्धा विचारायचं लक्षात आलं नाही.
तिचं ते हसरं आणि समाधानी रूप मनात साठवत तो तिला म्हणाला, "हो, खरच खूप छान होता सिनेमा. हल्ली चांगले मराठी चित्रपट यायला लागले आहेत. एवढे पैसे खर्च करावे लागले त्याचं काहीही वाटत नाही. हा चित्रपट पूर्णपणे पैसा वसूल होता." तिची ही मुद्रा एकदम घायाळ करणारी होती. अशा मंद स्मिताने तिने त्याचं भान अनेक वेळा हरपवलं होतं. आणि त्याला समाधानी पाहून तिला अजूनच आनंद झाला. खरं तर तो छोट्या-छोट्या गोष्टींवर समाधानी होणारा. अगदी चहातली साखर योग्य प्रमाणात आहे, हे लक्षात आलं तरी त्याच्या चेहर्यावर तीच समाधानाची भावना यायची. भानावर येत, तो म्हणाला, "चल, आज चायना इन द टाऊनला जेवायला जाऊ. तुझा वाढदिवस आहे, घरी जाऊन तेच खाण्यापेक्षा आज जरा वेगळं जेवू." तिला अजूनच धक्का बसला. रविवार सकाळी ब्रेकफास्ट बाहेर करायचा म्हंटलं तर तो तिला समोरच्या दर्शनी मधे घेऊन जायचा. लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तो तिला बेडेकर कडे मिसळ खायला घेऊन गेला. त्याच्या ह्या व्यवहारिक विचारांमुळे "रोमांस" ला फार चांस नव्हता. भावनेपेक्षा उपयोगितावर त्याचा जास्ती भर. म्हणून तिला भेट म्हणून चॉकलेटं, अत्तर, इ. न मिळता पुस्तकं, दुचाकीचं हेल्मेट, वगैरे असल्या गोष्टी मिळाल्या होत्या. "काय, आज स्वारी भलतीच खूष दिसतेय?" धक्क्यातून सावरत तिने विचारलं. "नवीन प्रोपोझल्स पास झाली की काय?" "नाही गं, मागे एकदा रोहन म्हणाला होता की चायना इन द टाऊन एकदम भारी हॉटेल आहे म्हणून. म्हंटलं तुझ्या वाढदिवसाची ट्रीट तिकडे द्यावी." "चल तर मग, लवकर गाडी काढ नाहीतर तिकडे गर्दी होईल, मग वेटींग झालं की तूच वैतागशील," गाडीतला रेडीओ लावताना तिने त्याला सांगितलं.
माणसाला आयुष्यात दैव, लक्ष्मी रोडवर पार्किंगचा त्रास आणि हॉटेलचं वेटींग, कधीच चुकत नाही. ह्या दोघांच्या बाबतीतही तेच झालं. तो गाडी पार्क करून येई पर्यंत तिने त्याला सांगितलं, "१५-२० मिनिटं तरी लागतील असं आतल्या माणसाने सांगितलं आहे. चल इथेच बाहेर बसू. इथे बसायची सोय तरी चांगली आहे." बाहेर "वेटींग" साठी सजवलेल्या कोचावर बसून दोघेही पारदर्शक काचेतून आतले नाट्य बघत बसले.
"मी जरा फ्रेश होऊन येते." बोलता-बोलता ती म्हणाली. "हूं, चालेल." तो म्हणाला. ती आत गेली आणि तो समोरच्या रस्त्यावरची वर्दळ न्याहळीत बसला. ही त्याची आवडती हौस! रस्त्यावरची वर्दळ आणि घटना पाहून स्वत:च्या डोक्यात त्या बद्दल अंदाज बांधत बसायचे. म्हणजे एखादी काकू भाजी वाल्याशी कुठल्या प्रकारे हुज्जत घालते, त्यावरून ती घरी सासूशी कसं वागत असेल, ह्याचा तर्क बांधायचा, किंवा एखादी तरुणी स्वत:ला गाडीवरून उतरून ज्या पद्धतीने सावरते, त्यावरून ती तिर्थरुपांच्या पैश्याची किती कदर करते, इ. अनेक प्रकारचे तर्क जुळवत बसायचे. हे तर्क बरोबर आहेत की नाही, ह्याची पारख करणं अर्थातच अशक्य. समोरच्या पदपथावर एक मुलगी बसली होती. तिच्या अवती-भवती तिने तिचं "दुकान" मांडलं होतं. गजरे आणि धूप-उदबत्त्या विकत बसली होती. बहुदा आज धंदा मंदा असावा. नाहीतर ही पोर एवढ्या उशीरा पर्यंत कशाला बसेल? त्याची अंदाज-पंची लगेच चालू झाली. तिच्या "दुकाना"वर येणार्या-जाणार्या लोकांना त्याने पारखायची सुरवात केली.

"काय रे? एवढं तल्लीन होऊन काय बघतोयस? की कुणाकडे बघतोयस?" ती त्याच्या मागे येऊन उभी राहिली. "हां, बरीच फ्रेश दिसतेस! वॉशरूम मधे पूर्ण वॉश केलंस की काय स्वत:ला?" मिश्किलपणे त्याने विचारलं. "तिकडे बघ, ती रस्त्याच्या पलीकडे बसलेली मुलगी पाहिलीस? एवढ्या उशीरा ती सामान विकत बसली आहे. चल जाऊन बघू." "अरे, कशाला? तिचं दिवसाचं ‘टार्गेट’ साध्य झालं नाही, म्हणून बसली असेल." एरवी त्याच्या स्वभावाला शोभणारं कोटि-युक्त वाक्य तिने टाकलं.
क्रमश:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा