आसाराम बापूं बद्दल मला पहिल्या पासून विशेष प्रेम नव्हते. कारण अनेक वर्षांपूर्वी आमची आई त्यांचे टी. व्ही. वरील कार्यक्रम सकाळी-सकाळी बघायची आणि त्यामुळे आमची झोप मोड व्हायची. त्यामुळे ह्या महाभागाचा मी फार काळ पाठलाग केला नाही. आणि गेल्या काही महिन्यातील त्यांची कृत्य बघता त्याना लहानपणीच सोडले ह्याचा आता मला आनंद होतो. "भाऊ" म्हणून विनंती केली असती तर दिल्लीतील त्या मुलीचा बलात्कार त्या इतर मुलांनी केला नसता, अशी मुक्ताफळं उधळल्यावर तर माझी खात्रीच पटली की हा माणूस आध्यात्मिक असूच शकत नाही. ज्यांना आपल्यातील पाशवी वृत्तींना काबूत ठेवता आले नाही, अश्या माणसांना दोषी न ठरवता, ह्या महाभागांनी त्या असहाय मुलीलाच दोष दिला. वर सल्ला, की बलात्कार होत असेल तर देवाचे नाव घ्या आणि बलात्कारी माणसाला भाऊ म्हणून हाक मारा. अहो कशाला त्या नात्याला दुषित करत आहात?
ह्याच आसाराम बापूंनी पर्वा नागपूर मध्ये होळी खेळण्याच्या नावा खाली पाण्याची अक्षम्य नासाडी केली. महाराष्ट्र राज्य भीषण दुष्काळाने ग्रस्त असताना होळी साठी पाण्याची एवढी नासाडी करायची हे शिकवण कुठल्या आध्यात्माच्या पुस्तकात किंवा लिखाणात सापडली? राज्यात जिथे अनेक गावां मध्ये लोकं पाण्यासाठी वणवण भटकत आहेत, पाण्या अभावी जनावरे मृत्युमुखी पडत आहेत, तिथे हे महाभाग आणि त्यांचे शिष्यगण पाण्याची होळी खेळण्यात धन्यता मानत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकी कडे पाणी वाचविण्याची कळकळीने विनंती करत असताना, हे बापूजी पाण्याची नासाडी करण्यात धन्यता मानतात. वर आडमुठेपणा, आम्ही पाण्यानेच होळी खेळणार!! म्हणे "केवळ" ६००० लि. पाणी वापरले. बापू, एवढ्या पाण्यात U.N.च्या संकेतांनुसार जवळ-जवळ ५० लोकांची दिवसाची पाण्याची गरज भागू शकते!! दुष्काळ जन्य परिस्थिती लक्षात घेता त्यांची २ दिवसांची गरज भागू शकते. आहात कुठे? आणि तुम्ही हे पाणी मोकळ्या मैदानावर उडवून लावले! शिवाय ह्या पाण्याने माखालेल्यांनी ते घालविण्यासाठी पुन्हा आंघोळ केली आणि अतिरिक्त पाणी वापरले ते वेगळेच. म्हणे काय तर होळी खेळल्याने लोकांचे आजार दूर होतात. वा रे, डॉक्टर! हे तुमच्या कडून आधी कधी नाही ऐकले. तुमच्या बरोबर होळी खेळायला आलेल्या भक्तांना असे काय आजार होते जे तुम्ही त्यांचावर असे पाणी उडवून दूर केले? ह्याचे प्रमाण काय? तुम्ही ते सिद्ध करा, मग आम्ही तुमचा नक्कीच सत्कार करू. पण हे न करू शकल्यास तुम्ही आध्यात्मातून सन्यास घ्या आणि असले अमानुष प्रकार बंद करा. हे पाणी जर तुम्ही स्वखर्चाने दुष्काळी गावांमध्ये पिण्यासाठी पाठवले असते तर कित्येक तहानलेली माणसं तृप्त झाली असती. पण नाही, स्वतःची विवेक बुद्धी गहाण ठेवून आपण केलेल्या चुकांना अजून अधिक पोरकट आणि बिनडोक बडबड करून झाकायचा प्रयत्न करायचा! आणि पिडीत जनतेच्या गरजांचा अजिबात विचार न करणे ह्यात कसले आले आध्यात्म? हा तर थोतांडपणा आहे.
५ टिप्पण्या:
हा आसाराम म्हणजे बौद्धिक दिवाळखोर माणुस आहे. कुठे काय बोलावं याची अक्कल नसलेला एक मूर्ख माणूस आहे हा.. मी तर याचं या पृथ्वी तलावरचे अस्तित्व नाकारायचा प्रयत्न करत असतो.
बाकी सगळ्या गोष्टी खऱ्या / बरोबर असल्या तरी होळी बद्दल तर त्यांचे काहीच चुकले नाही
१. दरवर्षी भरपूर पाऊस पडूनही अगदी डिसेम्बर मधेच हजारो - लाखो गावांना टँकरने पाणी पुरवावे लागते. या वर्षी दुष्काळ म्हणजे नक्की काय वेगळंय तेच काळात नाही. म्हणजे राजकारणी आणि नोकरशाहीच्या चुकीमुळे पाणी वाया गेले तर चालते आणि आसाराम बापूने केले कि .....
२. जर हाच सन एखाद्या 'अल्पसंख्य' लोकांचा असता तर त्यांच्या धर्म गुरुबद्दल कोणी एक तरी वावगा शब्द काढला असता का .....
+ what he did was legal with all permissions from municipal corporation etc. If anyone is to be blame here is the civic body....
अजून एक बघा
http://bashkalbadbad.blogspot.fr/2009_09_01_archive.html - विषय १: वादावादी . त्याचप्रमाणे जेवढे पाणी मिळते त्याच्या योग्य प्रकारे साठवण करून लोकांना पुरवावे - म्हणजे पाणी कपात, दुष्काळ - आणि म्हणून मग रोजगार हमी दुष्काळ निवारण योजना असली कुरणं बंद होतील
As per govt of Maharashtra's Own data <> http://envis.maharashtra.gov.in/envis_data/pdf/soer/chapter2.pdf
I guess even if this leakage is arrested, majority of the water problems can be solved.
Disclaimer - I'm no fan of Asaram or any other religious master - i think they all are thugs, but to blame them for water shortage is quite out of lin
Nitin:
1. I agree with you that the government and bureaucracy have failed the people with faulty and corruption ridden works. But, this does not absolve Asaram Bapu from all the wastage he oversaw. The drought has happened due to failure of the government to ensure good water distribution schemes. But, we have the option of dislodging this government in the next elections. Does Asaram provide such an opportunity? No! Given the situation that we are in, we need to regulate our behaviours. By debating how this situation has occurred, we are not going to be able to get through it. The debate can only lead to perhaps preventing a repeat of such a situation. The current actions need to be first directed at getting through this situations and second towards preventing a repeat.
2. Given the situation, it isn't fair to debate whether such an outrage would have occurred if this was a festival of some other religion. The drought has affected people of all religions alike. People who are displaced or have to sell-off cattle, land, homes, etc. don't have a religion. They are suffering because of the drought and help should be directed towards them all. If Asaram's tankers instead of spraying water would have gone to those villages, it would have helped them get through a day or two, definitely.
3. He might have procured the tankers legally, but doesn't he have the senses to not do such a thing in the face of drought? That is my point. Even Bhaskar Jadhav held a lavish reception for his kids' marriage, which was legal (not yet proven otherwise) but then it is not morally acceptable in the face of a crisis.
आता तर या आसारामाचे आध्यात्मिक थोतांड व बुवाबाजीचे पितळ उघडे पडले आहे व त्याची योग्य जागी (तुरुंगात) रवानगीही झाली आहे.त्याला किती शिक्षा होते तेच आता बघायचे !
टिप्पणी पोस्ट करा