गुरुवार, मे ०१, २००८

मामलेदाराची मिसळ

परीक्षा संपली!!! नेहमी पेक्षा अवघड गेली. पण ती संपल्याचा आनन्द साजरा करायचा होता. किंबहुना, ती कठीण गेल्याचे दुःख बुडवायचे होते. मग काय, सुशांतशी जी-टॉक वर चॅटींग झाले आणि ठरवले.... तुम्हाला काय वाटते, की गम का साथी रम? नाही.... बरेच दिवस आम्ही ठाण्यातल्या प्रसिद्ध मिसळवाल्या बद्द्ल ऐकत होतो. आणि ते बरेच दिवस तिथे न जाण्याचे एक कारण म्हणजे आम्ही त्याची ख्याती ऐकून घाबरत होतो... आम्हाला असं सांगाण्यात आलं होतं की त्याच्या मिसलीचा पहिला घास घेतल्या पासून नाका-तोंडातून पाणी वहायला सुरवात होते. पण गेल्या सोमवारी अभिजीत, सुशांत आणि मी हिम्मत करून गेलो.

राम-राणा जन्मला ती तळतळीत दुपारची वेळ होती (हा डायलॉग पु.लं.चा आहे, हे ठाऊक आहे मला). आम्ही मजल-दर-मजल करत एकदाचे त्या मामलेदाराच्या मिसळीच्या केन्द्रावर पोहोचलो. तिकडे पार रामच्या शेंडी पासून मारुतीच्या शेपटा पर्यंत रांग (हा पण डायलॉग पु.लं.चा आहे). आम्ही धीर करून रांगेत उभे राहीलो. रांग सांभाळयाला एक माणूस असल्याने मधे घुसणे कुणाला शक्य नव्हते. पाच मिनिटातच बाक-देवता आमच्यावर प्रसन्न झाली. बाकावर आम्ही तिघेही विराजमान होताच क्षणी, ऑर्डर सोडली- ३ मिसळ-पाव आणि ३ ताक. मिसळ आली आणि आम्ही तिच्या कडे २ क्षण नुसते बघत होतो. इतक्या दिवसांची उरात बाळगलेली इच्छा आज पूर्ण होत होती. लाल मिर्चीच्या रंगाने उजळून निघालेली ती तर्री, फरसाणाला पूर्ण पणे आपल्या रंगाचे करून आम्हाला आव्हान देत होती- असेल हिम्मत तर खाऊन दाखव. मग काय, पोटात कावळे ओरडत होतेच. आम्ही पण पावाचा तुकडा मोडला आणि तो तुकडा मिसळीत बुचकळला. पहिला घास.... जरा जपूनच... काय आहे, अगदी सचीन तेंडुलकर सुद्धा मॅग्राचा पहिला बॉल जपूनच खेळतो. त्या मिसळीच्या तिखटपणाची एवढी ख्याती ऐकली होती म्हणून पहिला घास घेताना जरा घाबरलो होतो.

पण पहिला घासा नंतर आम्ही सावरलो. मिसळ एवढी काय तिखट नव्हती. मिसळचं आम्हाला सांगितलेले वर्णन म्हणजे पर्थ टेस्टच्या आधी केलेल्या शॉन टेटच्या वर्णना सारखे होते. त्यानंतर शॉन टेटचा समाचार आपल्या फलंदाजांनी ज्या प्रकारे घेतला, त्याच प्रकारे आम्ही मिसळीचा घेतला. मधे-मधे ताकाचा आस्वाद घेत होतो. पहिली वेळ असल्याने थोडी सावधगिरी बाळगलेली बरी असते.

अखेरचा पावाचा तुकडा मिसळीत बुडवून खाताना आमच्या सगळ्यांच्या मुखावर एक वेगळेच तृप्तीचे भाव होते. इतके दिवसाची इच्छा अखेर पूर्ण झाली होती. तिथून बाहेर पडताना ह्या पंढरीची वारी जमेल तेवढ्या वेळा करायची असे ठरवूनच आम्ही निघालो.

मामलेदाराची मिसळSocialTwist Tell-a-Friend

४ टिप्पण्या:

Jaswandi म्हणाले...

mamledarachi misal tikhat lagali nahi? ascharya ahe! kanatun dhur nighana kay asta he pahilyanda mala ti misal khallyawar kalala!

blog mast ahe!

Vinay म्हणाले...

@jaswandi

मिसळ तिखट होती पण तिच्या बद्दल जसं ऐकलं होतं तेवढी तिखट लागली नाही. म्हणून तर आम्ही नंतर ताक पण प्यालो

अमोल केळकर म्हणाले...

तिथे कसे पोचायाचे सांगाल का ?

Vinay म्हणाले...

@ amol
ठाणे स्टेशन वरून बाहेर पडल्यावर आंबेडकर चौकात यायचे. तिथे आंबेडकरांचा पुतळा आहे. त्या पुतळ्याची पाठ ज्या दिशेला आहे, त्या दिशेला चालायचे. तिथे पुढ्च्या चौकात उजवी कडे जिल्हाधिकारी कार्यालय दिसेल. तिथे कुणालाही विचार. मामलेदाराची मिसळ कुठे मिळते.