१९९९-२००४च्या दरम्यान मंदीच्या काळात, तत्कालीन रा.लो.द. सरकारने अनेक मूलभूत सुविधा स्थापन करण्याचे प्रकल्प हाती घेतले. एकट्या सरकारी यंत्रणेला एवढी मोठी कामं जमणार नसल्याने ह्यातली अनेक कामे पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप मधे करण्यात आली. त्यातली सगळ्यात महत्वाची योजना म्हणजे दळण-वळणाच्या सुविधा सुकर करणे. म्हणजेच पंतप्रधान स्वपनिल सुवर्ण चतुर्भुज महामार्ग योजना. ह्या योजने अंतर्गत हे महामार्ग बांधणार्या कंत्राटदाराला पुढची ठराविक वर्ष त्याच्या ठरलेल्या सेक्शन साठी आलेला खर्च आणि डाग-डुजी साठी लागणार्या खर्चासाठी टोल आकरण्याची सोय आहे. अर्थात हा टोल शासनाकडून मान्य करून घ्यावा लागतो, व त्याची रीतसर पावती सुद्धा मिळते.
चारचाकी गाडी साठी, बहुतांश ठिकाणी, ह्या टोलचा (एका प्रवासा साठी) आकडा रु. २७, रु. ४७, वगैरे असा असतो. म्हणजे चालकाने रु. ३० अथवा रु. ५० दिले, तर ३ रुपये परत करणे अपेक्षित आहे. पण अनेक टोल नाक्यांवर हे वरचे सुट्टे पैसे परत करण्यावरून वाद होतात. पहिला वाद म्हणजे सुट्टे ३ रुपये नाहीत. तुम्हीच ७ रुपये सुट्टे द्या. ह्यावर मात करता यावी म्हणून ह्या टोल वसूली करणार्यांनी सुट्टे पैसे परत करण्या ऐवजी १ रुपयाची ३ चॉकलेटं परत करण्यास सुरू केलं. अनेक चालकांनी वाद नको, म्हणून हा पर्याय स्वीकारला. आणि अजूनही कुरकुर न करता ही चॉकलेटं घेताना अनेकजण दिसतात. आता सुट्टे असताना देखील चॉकलेटं परत करण्याची सुरवात झाली आहे. आपण जो पर्यंत हटकून सांगत नाही, तो पर्यंत आपल्याला वरचे २ रुपये देऊन ५ रुपये परत करण्याचा पर्याय सुचवत नाहीत.
ह्याचं कारण असं, की त्या चॉकलेट अथवा गोळ्यांची किरकोळ किंमत जरी १ रुपया प्रति नग असली, तरी कंत्राटदाराने त्या घाऊक दराने खरेदी केलेल्या असतात. त्यामुळे, अगदी नाही म्हंटलं तरी एका चॉकलेटची किंमत, त्याला ७०-८० पैसे, एवढीच पडते. वाहून न्यायचा आणि संचित करण्याचा खर्च शुन्य! कारण कामावर येणारा कर्मचारीच ते घेऊन येतो व त्याच्या बसायच्या ठिकाणीच तो ती चॉकलेटं ठेवतो. ह्याचा अर्थ असा, की प्रत्येक चॉकलेटा मागे तो २०-३० पैसे फायदा मिळवतो. पण पावती मात्र जेवढा टोल आकारला आहे, तेवढ्याचीच मिळते. म्हणजे हे वरचे पैसे त्याला निव्वळ नफा म्हणून मिळतात. आणि म्हणूनच सुट्टे पैसे परत करण्या ऐवजी, त्याला चॉकलेटं देणे अधिक फायदेशीर आहे. केवळ ह्या नफ्यासाठी त्याचे कर्मचारी हा पर्याय आपल्या पुढे ठेवतात असे समजायला हरकत नाही. बरं, जर आपण त्यांना वरच्या ७ रुपयां ऐवजी तेवढ्याच मूल्याची चॉकलेटं देऊ केली तर तिथले कर्मचारी आपल्याशी हुज्जत घालतात आणि ती चॉकलेटं घेणार नाही असं सांगतात. पण आपल्याला परत दिलेली त्यांना चालतात. दोन्ही वेळेस चालकाने काहीही बोलू नये, पण ह्या लोकांना हुकूमशाही करायची मुभा मात्र आहे.

1 टिप्पणी:
खरंय, कधी लक्षात नाही आली त्यांची ही लबाडी....
टिप्पणी पोस्ट करा