सांग सांग भोलानाथ, किंडल वरती मराठी मधली पुस्तके मिळतील काय? हा प्रश्न विचारायचं कारण असं की आता Amazon ने Kindle Fire टॅबलेट लाँच केलं आहे. Fireच्या आधीच्या Kindle e-book Reader हे वाचकांमधे सुपरहिट ठरलं आहे. जसं Appleच्या iPod ने संगीत क्षेत्रात क्रांती आणली होती, तशीच क्रांती Kindleने पुस्तक वाचनात घडवली. मुख्य म्हणजे Kindleच्या स्क्रीनचं तंत्रज्ञान असं होतं की वाटतं आपण खरंच एखादं छापील पुस्तक वाचत आहोत. त्यात Amazon ने आपलं एक स्वतंत्र Kindle e-book Store चालू केलं. त्यामुळे सर्व Kindle ग्राहकांना e-book विकत घेणं अतिशय सोपं झालं. माफक किमतीत क्लासिक्स, शिवाय रास्त दरात Best Sellers वगैरे विक्रीला उपलब्ध करून अमेरिकेत पुस्तक प्रमींना ह्याने वेड लावलं. आणि मुख्य म्हणजे ही सर्व पुस्तकं तुम्हाला ७X५च्या आकाराच्या ठोकळ्यावर नेता येतात. म्हणजेच तुमची पुस्तकं घरात जागा अडवत नाहीत आणि जागा बदलताना त्या पुस्तकांचे काय करावे, ह्याचा अजिबात प्रश्न नाही.
Kindle एवढं लोकप्रिय झालं की इतर टॅबलेट्स साठी Amazonने Kindle App काढलं. म्हणजेच तुमच्या iPad वरून किंवा Android टॅबलेट वरून Kindle App वापरून तुम्ही Kindle store मधून पुस्तकं download करून वाचू शकता. पण ही सगळी पुस्तकं इंग्रजी भाषेतील आहेत (आपल्याला मराठी, हिंदी आणि इंग्रजी सोडून इतर भाषा येत नाहीत, त्यामुळे इअत कुठल्या भाषेची पुस्तकं आहेत का, हे शोधायच्या भानगडीत कधीच पडलो नाही). पण मराठी अथवा हिंदी भाषेतील पुस्तकं Kindle store वर उपलब्ध नाहीत. ह्याचे कारण असे, की अजून मराठी प्रकाशकांनी आपल्या पुस्तकांची Kindle आवृत्ती काढलेलीच नाही! Amazonने १-२ वर्षांपूर्वी जाहीर केलं होतं की ते भारतीय प्रकाशकां बरोबर वाटाघाटी करून त्यांना पुस्तकांची Kindle आवृत्ती काढण्यास प्रेरीत करतील. पण तसं फारसं झालेलं दिसत नाही. झालच असेल, तर ते इंग्रजी पुस्तकं छापणार्या प्रकाशकां बरोबर झालं असेल. पण प्रादेशिक भाषेतील प्रकाशकांचे काय? ह्या प्रकाशकांकडे Amazon ने जाऊन त्यांना सुद्धा आपल्याकडील मराठी पुस्तकांची Kindle आवृत्ती काढण्यास उत्तेजीत केलं पाहिजे. नाहीतर ह्या प्रकाशकांनी तंत्रज्ञानातील प्रगती व बदलांचा आढावा घेऊन स्वत:च Kindle आवृत्ती काढण्यास सुरुवात केली पाहिजे. कारण आता परदेशात रहाणारा मराठी समाज खूपच मोठा झाला आहे. विशेष करून इंग्लंड, अमेरिका, कॅनडा व ऑस्ट्रेलिया मधे. इथल्या लोकांना मराठी पुस्तकं भारतातून मागवणे दर वेळेस शक्य नसतं. किंबहुना कुणी फारसं मागवतच नाही. बरं एखाद्या आवडणार्या पुस्तकाचं प्रकाशनच बंद झालेलं असतं. जुन्या अथवा उत्तम पण कमी विकल्या जाणार्या पुस्तकांची केवळ Kindle आवृत्ती काढल्यास अनेक वाचकांना त्याचा लाभ होईल. शिवाय, छपाईचा खर्च नसल्यामुळे प्रकाशकांवरचा खर्चाचा भार देखील कमी होईल.
पण माझं हे गार्हाणं कुणी ऐकत आहे का? की ह्याचं उत्तर केवळ भोलानाथच देऊ शकेल??
३ टिप्पण्या:
बुकगंगा डॉट कॉमकडे चौकशी करा
You are wrong.
Kindle file format (azw) is based on mobipocket standard which doesn't support unicodes other than latin.
Try creating a document in baraha and convert it on Amazon format. All you will see is squares.
Indian book reader (pi) does support Indic formats.
@Sharayu,
धन्यवाद! बुकगंगा डॉट कॉम वर अनेक ई-बुक्स उपलब्ध आहेत. त्यामुळे सोय होईल. तरी पण असे वाटते की सर्व प्रकाशकांनी आपल्या तर्फेच ई-बुक आवृत्ती काढावी.
@मनसे,
Amazon तर्फे आता अनेक format सपोर्ट केले जातात. तरी आपल्या प्रकाशकांनी त्याचा फायदा घ्यावा. शिवाय, azw format वर Indic fonts उपलब्ध करण्यासाठी Amazon वर दबाव का आणता येऊ नये?
टिप्पणी पोस्ट करा