रविवार, मार्च ०७, २०१०

एम. एफ. हुसैन बद्दल एवढा पुळका का?

गेल्या आठ-दहा दिवसात कधीतरी, सुप्रसिद्ध (की कुप्रसिद्ध) चित्रकार एम. एफ. हुसैनने आपलं भारतीय नागरिकत्व झिडकारून कतारचं नागरिकत्व स्विकारलं. त्यांना, म्हणे, कतारच्या शेखा (म्हणजे सौ. शेख) ने खुश होऊन तिथलं नागरिकत्व बहाल केलं. लागलीच भारतातल्या उदारमतवाद्यांनी आणि तथाकथित धर्मनिरपेक्ष-वाद्यांनी गळा काढला. हा दिवस भारतीय इतिहासात काळ्या अक्षराने लिहावा असा आहे, अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा पराभव, धर्मनिरपेक्ष सरकार धर्मांधां पुढे झुकलं वगैरे बोंबलायला सुरू केलं.

हुसैनला भारत सोडून बाहेर निर्वासित परिस्थितीत का रहावं लागलं ह्याचं कारण बहुतेकांना माहितच आहे. त्यांनी अनेक भारतीय देवींची नग्न स्वरूपात चित्र काढली. त्याचं उदाहरण ह्या संकेतस्थळावर मिळेल. पार दुर्गा पासून भारतमाता पर्यंत. त्यांच्या ह्या चित्रांमधल्या सगळ्या स्त्री रेखाटणांचे नितंब स्पष्ट दिसत आहेत. पण त्याच हुसैन नी आपल्या आईचं चित्र काढताना तिला संपूर्ण पणे व्यवस्थित झाकलं आहे. त्यांनी अजून एक चित्र काढलं आहे. पूर्ण कपडे घातलेला मुसलमान आणि त्याच्या शेजारी एक नग्न ब्राम्हण.

हे सगळं कशा साठी? त्यांच्या असल्या चित्रांनी हिंदूंच्या भावना दुखवल्या जाणं सहाजिकच आहे. पण वागळेंच्या IBN-लोकमत वाहिनी वर चर्चा करताना भाग घेणार्‍यां पैकी एकाचं मत असं पडलं की फक्त विकृत मानसिकतेच्या लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत. अरे आमच्या देवतांचं वाट्टेल तसं विडंबन करता आणि वर म्हणता की विरोध करणारे विकृत आहेत. लाज कशी नाही वाटत. आणि जेव्हा त्या यूरोपीय व्यंगचित्रकाराने पैगंबराचे व्यंगचित्र काढले, तेव्हा इथे आतंक माजवणार्‍या मुसलमानांना तुम्ही हीच गोष्ट का नाही सांगितली? तेव्हा मात्र त्यांची दाढी कुरवाळायला गेलात ना? असं करून धार्मिक भावना दुखावू नयेत. मुसलमान आधीच त्रस्त आहेत ११ सप्टेंबर मुळे, वगैरे.

अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्यांचं मत असं की त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करायचा पूर्ण अधिकार आहे. अरे चांडाळांनो, तुमच्या आईचं नग्न चित्र काढलेलं चाललं असतं का तुम्हाला? हुसैनला जर अभिव्यक्तिचं स्वातंत्र्य आहे तर त्याने त्याचा मिनाक्षी: टेल ऑफ थ्री सिटीज चित्रपट प्रदर्शनातून मागे का घेतला? काही मुसलमानांनी तेव्हा आरडा-ओरडा केला की त्या चित्रपटात नायिकेचं सौंदर्य व्यक्त करण्यासाठी जी विशेषणं वापरली आहेत ती पैगंबराच्या कन्येची नावं आहेत. म्हणून त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. आणि हुसैने गप्पपणे चित्रपट प्रदर्शन बंद करतो म्हणून ग्वाही दिली. तेव्हा हे धर्मनिरपेक्षतेचे पुरस्कर्ते कुठे लपले होते? आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्यांनी त्या वेळेला मूग गिळून गप्प बसणं का पसंत केलं? ह्याची उत्तरं कुणीही देत नाही. आणि असले प्रश्न विचारले की वागळे काका "कमर्शियल ब्रेक" ची घोषणा करतात. खानाच्या वधाच्या चित्रावरून जेव्हा दंगल घडली तेव्हा हिंदूंच्या आणि सत्याच्या बाजूनी उभं रहायला ह्यांच्या पैकी कुणीच का नाही आलं?

ह्या सगळ्या घटनांची साखळी बघता हुसैनचं खरतर भारतीय नागरिकत्व आधीच रद्द करायला पाहिजे होतं. पण नाही. हिंदूंची उपेक्षा करणं आणि मुसलमानांची दाढी कुरवाळणं ह्यालाच तर धर्मनिरपेक्षता म्हणतात. आणि हिंदूंनी आपल्या धार्मिक भावना व्यक्त केल्या तर ते मूळतत्ववाद ठरतं. खिलाफतीच्या आंदोलनापासून सावरकरांना जी भिती होती तेच घडतय. पण जागरूक आणि विचारवंत आणि अभिमानी हिंदूंनी शांत चित्ताने विचार करावा, म्हणजे त्यांच्या ही लक्षात येईल की हुसैन ने खरच आपल्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या बद्दल आपुलकी बाळगायची आपल्याला काहीही गरज नाही.

अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा अधिकार असला तरी प्रत्येक अधिकारा बरोबर कर्तव्य जोडलेली असतात. कुणाच्याही धार्मिक भावना दुखावू नये, हे हुसैनचं कर्तव्य आहे. त्याचा ह्या लोकांना विसर का पडतो? आणि आता कतार मधे ते हा अधिकार वापरून पैगंबराच्या बायकोचं त्याच्या मुलीचं नग्न चित्र काढून त्याची प्रदर्शनं भरवतात का ते बघू!
एम. एफ. हुसैन बद्दल एवढा पुळका का?SocialTwist Tell-a-Friend

६ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

हुसेनने भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला म्हणजे भारतातल्या घाणीतला एक किडा गेला. अशी घाण भारतीय राजकारण्यांनी मतांसाठी फार जपुन ठेवली आहे. ही सर्वच घाण हुसेन याच्यापासुन प्रेरणा घेवून भारतीयत्वाचा त्याग करेल तो दिवस लौकर यावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

प्रणव म्हणाले...

विनय,
चांगला विषय निवडला आणि काही नवीन माहिती सुद्धा मिळाली. धन्यवाद. मी देखील मागच्या आठवडयात हुसेनवर लिहिलंय. वेळ मिळाल्यास वाचा www.pranavw.wordpress.com .
- प्रणव

Vinay म्हणाले...

@अनामित,
हुसैनने भारतीय नागरिकत्व सोडलं. त्याने त्याचा त्याग केला नाही. त्याग ही फार मोठी गोष्ट असते.

@प्रणव,
तुमचा लेख वाचला आणि त्यावर टिप्पणी सुद्धा दिली आहे. माझ्या लेखावर आपण प्रतिक्रिया दिली, त्याबद्दल धन्यवाद.

vainatai म्हणाले...

हूसेन जर या देशाचे नग्रीकत्व परत करत असेल तर ते चांगलेच आहे त्यासाठी आमचे त्याला धन्यवाद आणि हा वागले एक नंबरचा भिकारचोट माणूस आहे. हे बेन आमच्या महाराष्ट्रात कुठून जन्माला आल समजत नाही

अनामित म्हणाले...

Those who expect to defend the right of expression should not fear to withstand the aftermath of their activities.

dilip h khadse म्हणाले...

chala ek kida tari baher padla
...
dilip